"आजही आपल्यावर अनेक अतिक्रमणे होत आहेत. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी आपणही आता सजग व्हायला हवे व हिंदुत्वासाठी एकत्र यायला हवे."
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी ज्या पद्धतीने लढा दिला आणि हिंदवी स्वराज्य (Hindu Swarajya) निर्माण केले त्या इतिहासाचा आपण गौरवाने उल्लेख करतो. मात्र, हे हिंदवी स्वराज्य आपल्याला टिकवायचे आहे. आजही आपल्यावर अनेक अतिक्रमणे होत आहेत. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी आपणही आता सजग व्हायला हवे व हिंदुत्वासाठी एकत्र यायला हवे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केले.