esakal | ना मंत्रिपदाचा बाज, ना डामडौल; गृहराज्यमंत्र्यांच्या दौऱ्याची चर्चाच : satej patil
sakal

बोलून बातमी शोधा

Satej Patil

ना मंत्रिपदाचा बाज, ना डामडौल; गृहराज्यमंत्र्यांच्या दौऱ्याची चर्चाच

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : ना मंत्रिपदाचा बाज ना डामडौल, ना कसला बडेजाव; पण ते आले आणि कसलाही अभिनिवेष बाळगता वर्षानुवर्षांचे ऋनाणुबंध असलेल्या सर्व पक्षातील आपल्या हितचिंतकांना भेटले. त्यांच्याशी भरभरून बोलले. सिंधुदुर्ग (Sindhudurg) दौऱ्यावर आलेले कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या आगळ्यावेगळ्या दौऱ्याची चर्चा सध्या तालुक्यात कुतुहलाने सुरू आहे.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आणि वैभववाडी तालुक्याचे ऋणानुबंध जगजाहीर आहेत. ते राजकारणात सक्रीय असताना त्यांनी वैभववाडीतील प्रत्येकाशी आपुलकीचे नाते जपले होते. त्या काळातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आज देखील त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सपंर्कात असतात. वैभववाडीवासीयांना आरोग्य किंवा अन्य कोणत्याही बाबतीत अडचण आली तर आजही अनेक जण त्यांच्याशी संपर्क साधतात. तितक्याच तत्परतेने त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील त्याची दखल घेतात.

हेही वाचा: थिबा पॅलेस नव्याने उजळणार; कलावस्तूंची होणार आठ दालने

सोमवारी (ता.२७) गृहराज्यमंत्री पाटील हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले; परंतु त्यांच्यासोबत अनावश्यक फौजफाटा नव्हता आणि गाड्यांचा मोठा ताफाही नव्हता. वैभववाडीत आल्यानंतर त्यांनी सुरूवातीला जिल्हा परिषदेचे माजी वित व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. तिथे रावराणे, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, बंड्या मांजरेकर, बाबा कोकाटे, शरद नारकर, रोहन रावराणे यांची भेट घेतली. त्यांची आपुलकीने विचारपुस केली. त्यानंतर तेथुन ते थेट जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांच्या निवासस्थानी पोहोचले. हारतुऱ्यांची कसलीही अपेक्षा न करता त्यांनी थेट चव्हाण यांच्या कुटुंबीयांना हाक दिली. चव्हाण यांना देखील विविध विषयावरून चिमटे काढले.

पंधरा ते वीस मिनिटांत त्यांनी हसतखेळत सर्वांशी चर्चा केली. चव्हाण कुटुंबीयांकडुन आदरतिथ्य देखील स्वीकारला. त्यानंतर शहरात प्रतीक्षेत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर कै. माजी सभापती आबासाहेब रावराणे यांच्या कुटुबीयाच्या घरी ते पोहोचले. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तेथुन ते ओरोसच्या दिशेने पुढील दौऱ्यावर निघाले. कोण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे असा कोणताही पक्षभेदाचा लवलेश त्यांच्या वैभववाडी दौऱ्यात दिसुन आला नाही. वर्षानुवर्षाचे वैभववाडी तालुक्याशी असलेले नाते पाटील कुटुंबीयांनी आजही टिकवुन ठेवल्याची प्रतिक्रिया तालुक्यात त्यांच्या दौऱ्यामुळे ऐकायला मिळत आहेत.

गाठीभेटींवर भर

गृहराज्यमंत्री असलेले सतेज पाटील हे काँग्रेसचे संपर्कमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागुन होते. त्यातच त्यांनी अनेकांच्या गाठीभेटी घेतल्यामुळे काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

loading image
go to top