कोकण : पालकमंत्र्यांनी विकास कामांसाठी निधी आणावा

पालकमंत्री उदय सामंत यांनी तालुक्यातील अधिकार्‍यांना धमकावण्यापेक्षा विकास कामांसाठी निधी आणल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू- संतोष किंजवडेकर
कोकण : पालकमंत्र्यांनी विकास कामांसाठी निधी आणावा
sakal
Updated on

देवगड : पालकमंत्री उदय सामंत यांनी तालुक्यातील अधिकार्‍यांना धमकावण्यापेक्षा विकास कामांसाठी निधी आणल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू; मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे कुटुंबावर सातत्याने गुंडगिरीचा उल्लेख करणार्‍या पालकमंत्र्यांच्या अशा प्रवृत्तीला काय म्हणावे? असा खरमरीत प्रश्‍न भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी उपस्थित केला. पदाच्या आशेने शिवसेनेत गेलेली मंडळी जन आशिर्वाद यात्रेवेळी देवगडात निदर्शने करीत होती अशी जळजळीत टीकाही किंजवडेकर यांनी यावेळी केली.

कोकण : पालकमंत्र्यांनी विकास कामांसाठी निधी आणावा
रत्नागिरीच्या पर्यटनासाठी भाटलेकरांचे नारायण राणेंना साकडे

‘तौक्ते’ चक्रीवादळातील नुकसानग्रस्त मच्छीमारांना मध्यंतरी मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांसमोर अधिकार्‍यांच्या घेतलेल्या झाडाझडतीच्या अनुषंगाने किंजवडेकर माध्यमांशी बोलत होते. यावेळी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, पंचायत समिती सदस्य अजित कांबळे उपस्थित होते.

किंजवडेकर म्हणाले, "तालुक्यातील कोरोनाला आळा घालण्यात पालकमंत्री सामंत पूर्णपणे अपयशी ठरले. मात्र कोरोना काळात सावधगिरीने काम करणार्‍या चांगल्या प्रशासकीय अधिकार्‍यांचा कार्यकर्त्यांसमोर पाणउतारा करण्यात त्यांना आनंद वाटतो. राणे कुटुंब गुंड प्रवृत्तीने वागत असल्याचा अनेकदा उल्लेख होतो. मग पालकमंत्री वागले त्याला काय म्हणावे? ‘त्या’ अधिकार्‍यांनी तालुक्याला आजवर चांगली सेवा दिली.

कोकण : पालकमंत्र्यांनी विकास कामांसाठी निधी आणावा
सहकारच राजकारण तापणार; जिल्हा बँकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात?

कार्यालयीन कामकाज करताना कधीही पक्ष पाहिला नाही. सर्वांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. मात्र पालकमंत्र्यांनी अशा अधिकार्‍याला कार्यकर्त्यांसमोर घेऊन ताशेरे मारून त्यांचा पाणउतारा केला ही वेगळी गुंडगिरी कुठली? तालुक्यासाठी पालकमंत्र्यांचे योगदान नाही, मात्र असलेल्या चांगल्या अधिकार्‍यांना घालवण्याचे काम होते. ठेकेदारांच्या सुचनेनुसार कामे घेतली जातात.

नेत्यांची कामे घेऊन त्यांचे पोट भरण्यापेक्षा गावागावातील विकास कामांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती घ्यावी. उपोषणाच्या माध्यमातून अधिकार्‍यांना टार्गेट करणे, विकास कामे करू न देणे अशा यंत्रणेला काय म्हणावे? जन आशिर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून शिवसेनेला पोटसूळ उठला असून पदाच्या आशेने तिकडे गेलेली मंडळी निदर्शने करीत होती."

निदर्शने करण्यापेक्षा विकासासाठी आमने-सामने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश जनतेपर्यंत पोचवण्यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जन आशिर्वांद यात्रा काढली. पक्षशिस्त मानून कार्यकर्ते गप्प होते; मात्र आता यात्रा संपली असल्याने निदर्शने करण्यापेक्षा विकासासाठी आमनेसामने यायला तयार आहोत असा सूचक संदेश संतोष किंजवडेकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com