गणेशमुर्तीच्या उंचीवरून कारवाई नको : पालकमंत्र्यांची पोलीसांना सुचना 

Guardian Minister uday samant ganesha festival  instruction to the police
Guardian Minister uday samant ganesha festival instruction to the police
Updated on

वैभववाडी( सिंधुदुर्ग) : गणेशमुर्ती दोन फुटाची असावी असा शासनाचा आग्रह असला तरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हयातील लोक चार पाच महिने गणेशमुर्ती निश्‍चित करीत असतात. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत घरगुती गणेशोत्सव या दोन जिल्हयात मोठ्या प्रमाणात होतो. गणेशोत्सवाच्या तोंडावर दोन फुटाच्याच मुर्त्या मिळणार नाहीत. त्यामुळे एखाद्याने कमी अधिक उंचीची मुर्ती आणली तर पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करू नये. अशी सुचना पालकमंत्री उदय सांमत यांनी येथे पोलीसांना दिली.


 कोरोनाच्या संकटात होत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर येथील पंचायत समिती सभागृहात पालकमंत्री श्री.सांमत यांनी आढावा सभा घेतली. या सभेला सभापती अक्षता डाफळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सांवत, प्रांतधिकारी वैशाली राजमाने, अतुल रावराणे, संदेश पारकर, संजय पडते, तहसिलदार रामदास झळके, मंगेश लोके, नंदु शिंदे, दिगंबर पाटील आदी उपस्थित होते. 

कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने खबरदारी म्हणुन गणपतीची मुर्ती दोन फुटाची बसवावी असे आवाहन केले असुन त्यासाठी आग्रह धरला जात आहे. यासंदर्भात निर्णय देखील होऊ शकतो. परंतु उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्हयात पांरपांरीक आणि घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जातो. येथील बहुतांशी लोक चार पाच महिने आपला गणपतीचा पाट मुर्तीकारांकडे देऊन मुर्ती निश्‍चित करीत असतात. दोन्ही जिल्हयात गणेशमुर्तीचे प्रमाण हे मोठे आहे. त्यातील अनेकांच्या मुर्त्या या दोन फुटांपेक्षा कमी उंचीच्या असतात. 

परंतु काहीच्या मुर्त्या त्यापेक्षा अधिक उंचीच्या असु शकतात.जरी दोन फुटाचा शासनाचा आग्रह असला तरी पोलीसांनी गणेशमुर्तीवरून कुणावरही कारवाई करू नये. मुर्ती व्यतिरिक्त जे केंद्र आणि राज्य शासनाचे कोरोना संदर्भात निर्णय आहेत त्याची कडक अमंलबजावण करावी असे पालकमंत्री श्री.सांमत यांन स्पष्ट केले.


 जिल्हयात सध्या १ लाख ७५ हजार मुंबई आले आहेत. अजुन लाखभर चाकरमानी गणेशोत्सवात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तयारी होणे आवश्‍यक आहे.आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी यापुर्वी प्रमाणे शाळा ताब्यात घ्या अशी सुचना देखील त्यांनी प्रांतंधिकाऱ्यांना केली.


 ती तर परमेश्‍वरांची रूपे आहेत.
आशा,अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी कोरोना काळात केलेल्या कामांची तुलना कदापि होऊ शकत नाही.ती तर परेश्‍वरांची रूपे आहेत असे स्पष्ट करतानाच त्यांच्या आरोग्यांची काळजी देखील आपण घेतली पाहीजे.त्यांना लवकरच रेनकोट पुरविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री.सांमत यांनी स्पष्ट केले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com