ब्रेकिंग : गुहागर - चिपळूण - रत्नागिरी मार्ग ठप्प....

Guhagar Chiplun Ratnagiri road jam
Guhagar Chiplun Ratnagiri road jam

चिपळूण - चिपळूण - गुहागर या महामार्गावरील गिमवी दरम्यान गॅसची वाहतूक करणारी गाडी घसरली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. येथे रस्ता रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी शेजारील पर्यायी रस्त्यावर पाणी मारले जाते. त्यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण होऊन गुहागरकडे जाणारी वाहतूक करणारी गॅसची गाडी घसरली सध्या गुहागर – चिपळूणकडे जाणारी वाहतूक  ताम्हाने देवघर – झोम्बडी गिमवी अशी सुरू आहे.

गुहागर तालुक्यातील देवघर ते शुंगारतळी रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे. रस्ता रुंदीकरणासाठी जो पर्याय रस्ता सुरू आहे. त्या रस्त्यावर धुळे म्हणून ठेकेदारामार्फत पाणी मारले जाते. मात्र रस्त्यावर असणारी चिकट माती आणि पाणी एकत्र आल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिकल होत आहे. याआधी अनेक दुचाकी चालक या रस्त्यावरून पडले आहे. अनेक वेळा ठेकेदाराला सांगू नये ठेकेदार रात्रीच्या वेळी पाणी मारत नसल्याने हे अपघात घडत आहेत. आज सकाळीच पाणी मारल्यानंतर रस्त्यावरून जाणारी चंद्रभागा गॅसची गाडी घसरली आणि मोठा अपघात होता होता वाचला मात्र सध्या या रस्त्यावर वाहतूक पूर्णत बंद आहे. लवकरच ठेकेदार रस्ता मोकळा करेल अशी आशा वाहन चालकांनी व्यक्त केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com