esakal | Guhagar : गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा
sakal

बोलून बातमी शोधा

collector ratnagiri

Guhagar : गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर: गणेशोत्सवाच्या काळात परगावातून अनेकजण कोकणात दाखल होतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ नये. आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. त्याचवेळी कोविड स्थिती नियंत्रणात ठेवता यावी, हा गाभा प्रशासनाने डोळ्यांसमोर ठेवून नियोजन केले आहे. हे नियोजन यशस्वी करण्यामध्ये जिल्हावासीयांचे सहकार्य महत्त्वाचे राहील, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पत्रकारांना दिली.

डॉ. पाटील दापोलीचा प्रशासकीय दौरा पार पडल्यानंतर शनिवारी (ता. ४) गुहागरला आले होते. त्यांनी तालुक्यातील कोविड नियोजनाची माहिती घेतली व प्रशासनाला गणेशोत्सवाबाबत केलेले नियोजन, त्याची अंमलबजावणी कोणी करावी, या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, परगावातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद आपण ठेवणार आहोत. एसटीद्वारे येणाऱ्या प्रवाशांची माहिती आगारातून तहसील कार्यालयाकडे येईल.

खासगी प्रवासी वाहनधारकांनी बसमधील प्रवाशांची माहिती जिल्ह्यात प्रवेश करताना तपासणी नाक्यावर आरटीओ किंवा पोलिसांकडे दोन प्रतीत द्यायची आहे. या संदर्भातील फॉर्मच्या नमुन्यांचे वितरण करून झाले आहे.

खासगी वाहनाने येतील, त्यांच्यासाठी ऑनलाइन गुगल फॉर्मची व्यवस्था आम्ही केली आहे. सदर फॉर्म त्यांनी भरून पाठवावा. न भरल्यास तपासणी नाक्यावर भरून द्यावा. या नियोजनामुळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होईल; मात्र प्रवासात अडथळा येणार नाही, ही माहिती ग्रामकृतिदलाकडे हस्तांतरित केली जाईल.

ज्यांनी कोरोना टेस्ट केलेली नाही, कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांची टेस्ट करून घेणे, विलगीकरणात ठेवणे, ही प्रक्रिया हे पथक करेल. गणेशोत्सवादरम्यान आरत्या, भजन, जाखडी आदी सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत. पेढा, बर्फी असे ओले पदार्थ प्रसाद म्हणून न देता सुका प्रसाद द्यावा, असेही श्री. पाटील म्हणाले.

कृत्रिम हौदात करा विसर्जन

गणेशमूर्तीचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी न करता कृत्रिम हौदात करावे. निर्माल्य परसावात विर्सजन करावे किंवा गावपातळीवर निर्माल्य कलश तयार करून निर्माल्य संकलित करावे. जनतेच्या आरोग्यासाठी या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यांची अंमलबजावणी जनतेने स्वत:हून करणे अपेक्षित आहे. शासन फक्त साह्यभूत ठरणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

महत्त्वाच्या विविध सूचना

  1. परगावातून येणाऱ्या प्रत्येकाची नोद ठेवली जाणार

  2. एसटी प्रवाशांची माहिती आगारातून तहसीलदारांकडे येणार

  3. खासगी प्रवासी वाहनधारकांनी प्रवाशांची माहिती देणे आवश्‍यक

  4. तपासणी नाक्यावर आरटीओ, पोलिसांकडे दोन प्रतीत माहिती द्या

  5. मिळालेली माहिती ग्रामकृतिदलाकडे होणार हस्तांतरित

  6. आरत्या, भजन, जाखडी असे सार्वजनिक कार्यक्रम करू नका

loading image
go to top