esakal | ओडिशा,आंध्रप्रदेशनंतर चक्रीवादळाची अरबी समुद्राकडे कूच? सिंधुदुर्गाची चिंता वाढली : Gulab Hurricane
sakal

बोलून बातमी शोधा

गुलाब चक्रीवादळ

चक्रीवादळाच्या सद्यस्थितीच्या प्रवासावरून चक्रीवादळ ३० सप्टेंबरपर्यंत अरबी समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाची अरबी समुद्राकडे कूच? सिंधुदुर्गाची चिंता वाढली

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

वैभववाडी : ओडिशा आणि आंध्रप्रदेशला (Odisha, Andhra Pradesh) धडकल्यानंतर तीव्रता कमी झालेल्या गुलाब चक्रीवादळाचा प्रवास अरबी समुद्राकडे होण्याचा अंदाज आहे. तसे झाल्यास त्याची तीव्रता पुन्हा जाणवणार असल्यामुळे सिंधुदुर्गाची (Sindhudurg) चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहेत.

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळ रविवारी (ता. २६) आंध्रप्रदेश आणि ओडिशाला धडकले. त्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली; परंतु वादळ प्रणालीचा महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. चक्रीवादळाच्या सद्यस्थितीच्या प्रवासावरून चक्रीवादळ ३० सप्टेंबरपर्यंत अरबी समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे. तेथे पोहोचल्यानंतर मात्र त्याचा प्रभाव अधिक जाणवण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संभाव्य चक्रीवादळाच्या शक्यतेने पुन्हा एकदा जिल्ह्यावर संकटाचे ढग जमा होऊ लागले आहे. यापूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाची धग बहुतांशी जिल्हावासीयांनी अनुभवली आहे.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील,सोमय्यांकडून न्यायालयाचा अवमान ; शुक्रवारी सुनावणी

आंबा, काजू, सुपारी याशिवाय इतर फळबागायतदार, मच्छीमार या सर्वांनाच मोठा तडाखा बसला होता. हजारो लोक अद्याप सावरलेले नाहीत. नव्या वादळामुळे भात उत्पादकासह सर्व फळ बागायतदारांमध्ये भीतीचे सावट कायम आहे. या चक्रीवादळाचा परिणाम जाणवला, तर सर्वाधिक नुकसान भातशेतीचे होणार आहे. भातपीक नुकतेच परिपक्व होताना दिसत आहे, तर आणखी आठ ते दहा दिवसांनी मोठ्या प्रमाणात भातपीक परिपक्व होण्याची प्रकिया सुरू होईल. त्यातच चक्रीवादळामुळे पावसाचे प्रमाण वाढले, तर भात उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची भीती आहे.

पाऊस सुरूच

जिल्ह्याच्या काही भागात कालपासून सुरू झालेला पाऊस आज देखील कायम आहे. सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. काही भागात पहाटेपासून पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या, तर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आणि सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे. याशिवाय जिल्ह्याच्या इतर भागात देखील पावसाच्या सरी पडत आहे. हा पाऊस गुलाब चक्रीवादळाचा परिणाम मानला जात आहे.

loading image
go to top