Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गला गारपिटीचा तडाखा; कणकवली, वैभववाडीत आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान

Agriculture Loss : अवकाळी हवामानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून नुकसानभरपाईची मागणी होत आहे.गारपिटीच्या तडाख्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
unseasona Rain

unseasona Rain

sakal

Updated on

वैभववाडी : गारपीट, वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागाला आज सायंकाळी पावसाने झोडपले. विशेषतः निमअरुळे परिसराला वादळाचा मोठा तडाखा बसला असून, गावातील ट्रान्स्फॉर्मरसह सहा वीज खांब कोसळले आहेत. या गारपिटीचा मोठा फटका आंबा व काजू पिकांसह काढणीला आलेल्या रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची मोठी तारांबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com