मुलीकडचे म्हणून कोंडगावकरांकडे दुर्लक्ष नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Development Of Kandgaon Needed Ratnagiri Marathi News

श्री देव मार्लेश्वर व कोंडगावची श्रीदेवी गिरिजा यांचा लग्नसोहळा म्हणजेच कल्याणविधी सोहळा चार दिवसांवरच येवून ठेपला आहे.

मुलीकडचे म्हणून कोंडगावकरांकडे दुर्लक्ष नको

साडवली ( रत्नागिरी ) - कोंडगावची गिरिजा ही मार्लेश्वरची पत्नी आहे. हे मंदिर कोंडगाव साखरपा रस्त्यालगतच आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातून मार्लेश्वर क्षेत्री येणारा भाविक गिरिजा देवीच्या दर्शनाला थांबला तर या देवस्थानचे उत्पन्न वाढू शकते. कोल्हापूरपासून कोंडगाव 85 कि.मी., तर रत्नागिरीपासून 55 कि.मी. अंतरावर आहे. मार्लेश्वर क दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणचा विकास करताना गिरिजादेवी देवस्थानकडेही शासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी बापू शेट्ये, काका शेट्ये यांनी केली आहे. 

श्री देव मार्लेश्वर व कोंडगावची श्रीदेवी गिरिजा यांचा लग्नसोहळा म्हणजेच कल्याणविधी सोहळा चार दिवसांवरच येवून ठेपला आहे. या लग्नाच्या धामधुमीत मुलीकडच्या म्हणजेच गिरिजादेवीकडील देवस्थानसमोर आर्थिक खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, असा प्रश्न आहे. बापू शेट्ये यांनी, आम्ही गेली पाच वर्षे हा विषय हाताळत असल्याचे सांगितले. 

हेही वाचा - काँग्रेस आघाडीतील बंडखोरी येथे सेनेच्या पथ्यावर 

हे भाविकांना चालणारच नाही

मार्लेश्वर देवस्थान ट्रस्ट, गिरिजादेवी देवस्थान, मानकरी तसेच स्थानिक प्रशासन, पोलिस ठाणे यांच्या यात्रोत्सवापूर्वी विशेष बैठका होतात. त्यामध्ये त्या त्या वेळचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक कल्याणविधी सोहळ्यासाठी होणाऱ्या खर्चात कपात करा, असा सल्ला देवून परंपरेनुसार चालत आलेली प्रथा बंद करू नका, असा सल्ला देतात. खर्चात कपात करायची म्हणजे चालीरीतीला मुरड घालायची, हे भाविकांना चालणारच नाही. कारण ताशेवाजंत्रीचा खर्च कमी करण्यासारखा नाही व पालखी वाहून नेणारी माणसेही कमी करून चालणार नाहीत, असे शेट्ये यांनी सांगितले. 

हेही वाचा - लांजा नगरपंचायतीवर यांचा झेंडा 

...म्हणून तो खर्च वाचतो 

उत्सवासाठी म्हणावी तशी आर्थिक मिळकत जमा होत नाही. वाजंत्रीवाले दहा हजार, जेवणावळीचे दहा हजार, पालखी वाहण्यासाठी पाच हजार असा मेळ जमवावा लागतो. पालखी मार्गावर गुरववाडी, घनकिंजळ, बोंड्ये, सुतारवाडी, गुरववाडी, मारळ पोईची पायरी अशा पालखी मार्गावर त्या, त्या गावातील लोक खाण्याची सोय करतात. तसेच मारळ नदीत वस्तीवेळी सावंत जेवणाची सोय करतात, म्हणून तो खर्च वाचतो. 

परंपरा जोपासायला हव्यात
कल्याणविधी सोहळा झाल्यानंतर मार्लेश्वर देवस्थान व गिरिजादेवी देवस्थान, मानकरी कुमकर, ग्रामस्थांची बैठक घेवून यातून तोडगा काढण्याचे ठरवायला हवे व या प्रथा परंपरा टिकवायला हव्यात. पालखी चालत नेण्याची प्रथा बंद करणे, भाविकांना न पटण्यासारखे आहे. यातून कायमस्वरुपी तोडगा काढण्याकडेच आमचा कल आहे. 
- बापू शेट्ये  

 
 

टॅग्स :KolhapurThane