हापुस निर्यातीबाबत अनास्था 

hapus exports issue konkan sindhudurg
hapus exports issue konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - परदेशात हापूस निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या अपेडा ऍपच्या संकेतस्थळावर नोंदणीसाठी मॅंगोनेट प्रणाली विकसित केली आहे. सहा वर्षांत यावर 1964 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. 2019-20 यावर्षी केवळ 70 बागायतदारांनी नोंदणी केली आहे. डिसेंबर 2019 ते मार्च दरम्यान असलेल्या कोरोनाच्या प्रभावामुळे ही नोंदणीची संख्या घटलेली दिसून येत आहे. 

राज्यात सहा वर्षांपूर्वी या मॅंगोनेट प्रणालीची सुरुवात झाली होती. या नोंदणीत बागायतदार कोणत्या देशात निर्यात करण्यास इच्छुक आहेत त्याची सर्व माहिती ऑनलाइनमधून त्या देशांच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया व्हायची. 2014-15 मध्ये ही मॅंगोनेट प्रणाली सुरू झाली. आधुनिक काळामध्ये बदलत्या तंत्रज्ञानानुसार शेतीमध्ये विविध बदल असताना जिल्ह्याचे महत्त्वाचे पीक असलेला हापूस आंबा विशेषतः देवगड हापूस राज्य व देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. बागायतदारांना स्थानिक बाजारपेठेतच व राज्य मर्यादित न राहता हापुसची ओळख परदेशात असतानाही त्याची चवही परदेशात पोहोचवावी, त्यासाठी मॅंगोनेट प्रणाली विकसित करण्यात आली. 

2014-15 मध्ये ही मॅंगोनेट प्रणाली सुरू झाली. या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांनी आंबा बागांची माहिती ऑनलाईन नोंदवून त्यानंतर दरवर्षी या शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनिकरण करण्यात येते. प्रमाणपत्राच्या खाली नवीन वर्षात नूतनीकरणाची टीप दिलेली असते. जिल्ह्यातील हापूसची वेगळी ओळख परदेशात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशात हापूस निर्यात होतो. तो ज्याठिकाणी जातो त्याठिकाणी हापूस नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्‍स सोबत जाते. त्यामुळे परदेशातील लोकांना हापूस नेमका कुठून आला आहे, याची माहिती मिळते. त्यामुळे काही शास्त्रज्ञ अभ्यासक या हापूसची पाहणी करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी भेटी देऊ शकतात. अशावेळी बागायतदारांना चांगला दर उपलब्ध होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. 

जिल्ह्यात 7 वर्षांत 2021 एवढी नोंदणीमध्ये झाली असून डिसेंबर ते मार्च हा कालावधी नोंदणीसाठी ठेवण्यात येतो. 2014 रोजी चांगला प्रतिसाद, त्यांनतर अल्प प्रतिसादानंतर पुन्हा 2018-19 ला चांगला प्रतिसाद मिळला. कमीत कमी दहा गुंठे क्षेत्रात बागायत असणाऱ्या शेतकरी यावर नोंदणी करू शकतो. जिल्ह्यात 2020-19 या वर्षांत डिसेंबर ते मार्च दरम्यान जवळपास 70 बागायतदारांनी मॅंगोमध्ये नोंदणी केली आहे. हे प्रमाण त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत खूपच कमी समजले जात आहे. परदेशामध्ये कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला असल्याने यावेळी आयात-निर्यात धोरणावर परिणाम दिसून आला होता. त्याचा प्रभावही मॅंगोनेट प्रणालीवर झाल्याने निर्यातीसाठी कमी शेतकऱ्यांकडून नोंद करण्यात आली. यंदाच्या डिसेंबरपासून पुन्हा एकदा नोंदणी सुरू होणार असल्याने कृषी विभागाकडून ही नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. 

हापूसची व्हाया वाशी निर्यात 
थेट परदेशात निर्यात केंद्र नसल्यामुळे सिंधुदुर्गातील हापूस परदेशात किती गेला, कोणत्या देशात गेला? कोणत्या भागातून चांगली मागणी आहे? हे अनुत्तरीतच राहिले आहे. मुंबई वाशी येथील बाजारपेठेतून हापूस परदेशात जात असल्याने हापुसचे परदेशातील स्थान त्याची मागणी याची माहिती मिळणे कठीण बनते. रत्नागिरीतील हापुस थेट परदेशात जात असल्याने परदेशातील कोणत्या देशात किती हापूस गेला? याची माहिती अपेडा ऍपच्या साईटवरून प्राप्त होते. या माहितीचा पुढील अभ्यासासाठी उपयोग होऊ शकतो. 

थेट निर्यातीची गरज 
सिंधुदुर्गात देवगडमधील जामसंडे येथून थेट हापूस परदेशात निर्यात होण्यासाठी केंद्र होते; मात्र ते फार काळापर्यंत कार्यरत राहिले नाही. सिंधुदुर्गच्या हापूसला जीआय मानांकन आहे. शिवाय चवीमुळे वेगळी ओळख आहे. त्यामुळे थेट परदेशात विक्री होण्यासाठी हालचाली होणे आवश्‍यक आहे. देवगड (विजयदुर्ग) येथील बंदरातून हापुस निर्यातीचे धोरण होणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास त्याचा फायदा बागायतदारांना नक्की होईल. 

*वर्ष*नोंदणी 
2014-15*772 
2015-16*389 
2016-17*405 
2017-18*03 
2018-19*382 
2019-20*70 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com