
पावस (रत्नागिरी) : नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात रत्नागिरी तालुक्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात दाखल होत आहे. यंदा रत्नागिरीतून सर्वप्रथम हापूस पाठवण्याचा मान पावस महातवाडी येथील शकील उमर हरचिरकर व चांदेराई येथील रेहान जब्बार बंदरी यांनी मिळवला.
हरचिरकर यांनी हापूस आंब्याच्या दोन पेट्या मुंबईतील वाशी बाजारात, तर बंदरी यांनी सहा डझन आंबे गुजरातमधील अहमदाबाद येथे पाठवल्या आहेत. अहमदाबादमध्ये या आंब्यांना तब्बल २५ हजार रुपयांचा दर मिळाला.