

Heat, Water Scarcity and Struggle: Nomadic Shepherds Face Tough Journey
esakal
-अमित गवळे
पाली: राज्यातील दुष्काळी व निमदुष्काळी भागातील मेंढपाळ, विशेषतः धनगर समाज, पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी आपला कुटुंबकबिला आणि शेळ्या-मेंढ्यांसह शेकडो किलोमीटरचा प्रवास करून कोकणात, विशेषतः रायगड जिल्ह्यात दाखल होतो. मात्र, रणरणता उष्मा, पाण्याची टंचाई आणि अवकाळी पावसाचा फटका यामुळे या मेंढपाळांची मोठी वाताहत होते. आता पावसाळा जवळ येत असल्याने या मेंढपाळांना आपल्या मूळ गावी परतण्याचे वेध लागले असून, त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.