आगामी निवडणुकीत राजकीय वध होण्याच्या भितीनेच राणे सैरभैर

आगामी निवडणुकीत राजकीय वध होण्याच्या भीतीनेच बेताल वक्तव्य ;हरी खोबरेकरांच्या नीलेश राणेंवर निशाणा
Sindhdurg
SindhdurgEsakal

मालवण (सिंधुदुर्ग) : आमदार वैभव नाईक (vaibhav Naik) यांनी निवडणुकीत राणे कुटुंबीयांना मदत केल्याचा निलेश राणेंनी (Nileh Rane)केलेला आरोप हा हास्यास्पद आहे. हिंमत असेल तर त्यांनी याबाबतचे पुरावे सादर करत दुध का दुध पानी का पानी करून दाखवावे. वैभव नाईक हे कलियुगातील श्रीकृष्ण असून आगामी निवडणुकीत त्यांच्या हातून राजकीय वध होण्याच्या भितीनेच निलेश राणे हे सैरभैर झाले असून बेताल वक्तव्य करत असल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर (Hari Khobrekar)यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

निलेश राणे असो अथवा केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) या दोघांना शिवसेनेने दोन वेळा पराभवाची धूळ चारली. हेच शल्य राणे कुटुंबीयांना असल्याने पराभवाचे शिलेदार असलेल्या आमदार नाईक यांच्यावर ते सातत्याने खोटे आरोप करत असल्याचेही खोबरेकर यांनी स्पष्ट केले.

Sindhdurg
निवडणुकीत राणेंना पक्षाची गुप्त माहिती पुरविणारे वैभव नाईकच

येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद झाली. यावेळी पालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेवक पंकज सादये, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, दीपा शिंदे, किसन मांजरेकर, सन्मेश परब, सिद्धेश मांजरेकर, विघ्नेश मांजरेकर, अमेय देसाई, संमेश परब, सिद्धेश मांजरेकर, विघ्नेश मांजरेकर, अमेय देसाई यांच्यासह अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

खोबरेकर म्हणाले, "निलेश राणे यांची भाषाशैली सर्वश्रुत आहे. त्यामुळेच त्यांच्या नावासमोर माजी खासदार ही बिरूदावली जनतेनेच लावली आहे. आमदार वैभव नाईक मतदार संघातील घराघरात पोचले आहेत. आमदार कसा असावा, मतदार संघात त्याचा संपर्क कसा असावा, याचे अनुकरण जिल्ह्यात अनेक जण आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाहून करतात. जनता आणि कार्यकर्त्यांशी विनम्रपणे वागताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच जनतेच्या हक्कासाठी सत्तेत राहूनही रस्त्यावर उतरण्याची धमक आजपर्यंत अनेक वेळा आमदार नाईक यांनी दाखवली आहे. त्यांच्यासारख्या आमदाराचा आम्हा शिवसैनिकांना अभिमान आहे."

ते पुढे म्हणाले, "लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा पराभूत झालेले निलेश राणे जनतेतून दोन वेळा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर आरोप करतात, हे हास्यास्पद आहे. केवळ स्वतःच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी ते अशाप्रकारची बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांच्या वक्तव्याकडे खासदार विनायक राऊत असो अथवा आमदार वैभव नाईक ढुंकूनही पाहत नाहीत. मतदारांनी दोन वेळा त्यांना घरात बसवले. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांच्या विजयाची खात्री असल्याने त्यांच्यावर राणे आरोप करत आहेत.

राणेंच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या गोटातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आज शिवसेनेत दाखल झाले आहेत. येत्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व नगरपालिका, नगरपंचायतीवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असून त्यानंतर स्वतःला बसायला जागा शोधण्याची वेळ राणे आणि त्यांच्या समर्थकांवर येणार आहे. वैभव नाईक यांच्यावर गद्दारीचा आरोप करण्यापूर्वी त्यांच्या विरोधातील पुरावे हिंमत असेल तर राणेंनी सादर करावेत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com