
मालवण : प्रीपेड वीज मीटरमुळे तिप्पट, चौपट वीज बिले येत असून सर्वसामान्यांची लूट होत आहे. मात्र, याला विरोध दर्शविणारी एकही गोष्ट सत्ताधारी खासदार, पालकमंत्री, शिंदे गटाचे आमदार यांच्याकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रीपेड मीटर हे भाजप, शिंदे गटाचे आणि महायुतीच्या सत्तेत असणाऱ्या सर्व घटकांचे हे पाप आहे, असा आरोप ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.