

Harnai Fishing Crisis
esakal
दापोली: दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर मोठ्या अपेक्षेने १५ ऑगस्टपासून समुद्रात उतरलेल्या हर्णैतील मच्छीमारांसमोर आता दुहेरी संकट उभे ठाकले आहे. एकीकडे समुद्रात अपेक्षेप्रमाणे मासळी मिळत नसल्याने ‘मासळी दुष्काळा’ची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे खवळलेल्या समुद्रात मासेमारी करणे धोकादायक ठरत आहे. परिणामी, हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छीमारांच्या आर्थिक गणितावर पाणी फिरले असून, शासनाने मत्स्यदुष्काळ जाहीर करून मच्छीमारांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.