harne beach
sakal
दापोली - दिवाळी सुट्टी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर दापोली तालुक्यातील किनारपट्टीवर पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. विशेषतः हर्णे बंदरात गेल्या तीन दिवसांपासून सकाळी व संध्याकाळी पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळत असून आज (ता. २५) सकाळी तर बंदर जत्रेसारखे गजबजून गेले होते. पर्यटकांच्या मासळी खरेदीतून दररोज लाखोंची उलाढाल होत असून मच्छीमार महिलांना चांगला फायदा मिळत आहे; असे येथील मच्छिमारांनी सांगितले.