
शैक्षणिक सॉफ्टवेअर, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षक आणि मेंदूच्या विकासासाठी तयार केलेली खेळं ही सर्वतंत्रज्ञानाची देणगी आहे, जी आपली विचारशक्ती आणि सर्जनशीलता वाढवते; पण या प्रगतीचा दुसरा, अधिक गंभीर चेहराही आहे. तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे मानवाचे शरीर जड, सुस्त आणि गतिशून्य होत चालले आहे. यंत्रांवर इतकी अवलंबित्व वाढली आहे की, माणसाची स्वतःची कौशल्ये मागे पडत आहेत. स्क्रीनसमोर घालवलेला वेळ डोळ्यांच्या आरोग्यावर, झोपेवर आणि शरीराच्या सर्वसामान्य हालचालींवर परिणाम करत आहे. मानसिक आरोग्यावरदेखील तंत्रज्ञानाचा छळ जाणवत आहे. माहिती सहज उपलब्ध असल्यामुळे विचारांची खोली कमी होत चालली आहे; विचार करण्याची, संशोधन करण्याची जिद्द माणसाने गमावली आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ताणतणाव, एकाग्रतेचा अभाव आणि आत्मविश्वासाची कमी निर्माण होत आहे. आभासी जगाच्या खोट्या प्रतिमा आणि अपेक्षा वास्तविकतेला गिळून टाकत आहेत, ज्यामुळे नैराश्य आणि आत्मतिरस्कार वाढत आहे.
- प्रा. डॉ. वाय. आर. कुळकर्णी, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल