
-अमित गवळे
पाली : पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेण्यासाठी रविवारी (ता. 20) दुपारी आदिवासी समाजाचा रोशन सत्यवान पवार हा तरुण आला होता. मात्र यावेळी येथे एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते. अडीच ते तीन तासानंतर खवली येथील डॉक्टरांनी येऊन या तरुणाला तपासले व इथे उपचार करणे शक्य नसल्याचे सांगून या तरुणाला जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचारासाठी नेण्यास सांगितले. मात्र 108 व 102 रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध झाल्या नाहीत. नाईलाजाने पदरमोड करून खाजगी रुग्णवाहिकेतून या तरुणाला अलिबाग येथे देण्यात आले.