empty Beer Bottles on pali khopoli road
sakal
पाली - पाली-खोपोली राज्य महामार्गावर आंबोले गावापासून ते थेट खुरवले पेट्रोल पंपाच्या पुढपर्यंत रस्त्यावर हजारो रिकाम्या दारू आणि बिअरच्या बाटल्या पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर या बाटल्या फुटल्या असून, रस्त्याभर काचांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहनांच्या टायरमध्ये काचा घुसून टायर पंक्चर झाले असून, अपघाताचा अत्यंत गंभीर धोका निर्माण झाला आहे.