esakal | सिंधुदुर्गावर अवकाळीचे सावट कायम 
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain banda konkan sindhudurg

वैभववाडी तालुक्‍यात या पावसाने काल जोरदार तडाखा दिला. आज सायंकाळी याचा सिलसिला सुरूच होता. बांदा परिसरात सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे रहदारी मात्र थांबली होती. 

सिंधुदुर्गावर अवकाळीचे सावट कायम 

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गावर अवकाळी पावसाचे सावट आज दुसऱ्या दिवशीही कायम होते. दोडामार्ग तालुक्‍यातील काही भागासह बांदा परिसरात मेघगर्जनांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. आंबा, काजूच्या ऐन हंगामात पाऊस आल्याने बागायतदारांवर अस्मानी संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कालपासून (ता.18) अवकाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. वैभववाडी तालुक्‍यात या पावसाने काल जोरदार तडाखा दिला. आज सायंकाळी याचा सिलसिला सुरूच होता. बांदा परिसरात सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे रहदारी मात्र थांबली होती. 

काजूचे काढणीयोग्य पीक झाले असून अवकाळी पाऊस लागल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सरकारने याची दखल घेऊन झालेल्या आंबा व काजू पिकाची नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी आंबा व काजू बागायतदारांमधून होत आहे. 

मडुरा पंचक्रोशीतील दुपारी तीनच्या सुमारास पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे, शेर्ले भागांतही वाऱ्यांसह पावसाचा शिडकाव झाला. गव्यांचा धुडगूस सुरू असतानाच आता अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. ऐन काजू हंगामाच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. 
दरम्यान, दोडामार्ग तालुक्‍यातील काही भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोलझर परिसरात दुपारी पावसाचा शिडकाव झाला. अचानक आलेल्या पावसाने स्थानिकांची तारांबळ उडाली.