परतीच्या पावसाचा हाहाकार, कोकणाला झोडपले

heavy rain in konkan sindhudurg
heavy rain in konkan sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) - जिल्ह्याला आज परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वैभववाडी, देवगडमध्ये ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाला असून किनारपट्टी भागालाही पावसाचा फटका बसला. दुपारपासून कोसळत असलेल्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4600 मिलिमीटर सरासरी इतका पाऊस झाला असून भात पिके पाण्याखाली गेली आहेत. 

जिल्ह्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने आता परतीचा प्रवास सुरू केला आहे; मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार मागील तीन दिवस पावसाची शक्यता होती. त्यानुसार आज दुपारनंतर मात्र जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला. वैभववाडी आणि देवगडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. वादळी वारा आणि वीजांच्या लखलखाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मोजक्‍या तासात 99 मिलीमीटर इतका पाऊस झाला. आज दुपारनंतरही पावसाने किनारपट्टी भागाला चांगलेच झोडपून काढले. जोराच्या पावसामुळे स्थानिक मच्छीमारी थंडावली. 

गेले काही दिवस येथे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. वातावरणातील उष्णता वाढली होती. अधुनमधून ढगाळ वातावरण तयार होत होते. त्यामुळे जोराच्या पावसाची शक्‍यता वर्तवली जात होती. त्याच काल (ता.10) रात्री वीजांच्या लखलखाटासह येथे जोराच्या पावसाला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मोजक्‍या तासात 99 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. जोराच्या पावसामुळे वीज गायब झाली होती.

आज सकाळपर्यंत तालुक्‍यात 3834 मिलीमीटर इतका पाऊस झाला. आज दुपारनंतर तालुक्‍यात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली गेले. ठिकठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. जोराच्या पावसामुळे स्थानिक मच्छीमारीला ब्रेक लागला. छोट्या मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळल्याचे चित्र होते. 
सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्‍यातही अनेक ठिकाणी शेत शिवारात पाणी शिरले. नदीनाल्यांना पूरसदृश्‍य स्थिती होती. दुपारी साधारण दोन वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. ढगाळ वातावरण असल्याने अंधार दाटून आला होता.

हवामानातही प्रचंड गारवा होता. पावसामुळे ठिकठिकांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. देवगड, विजयदुर्ग परिसरात आज पावसाचा जोर प्रचंड होता. या परिसरात हळवी भातशेती मोठ्या प्रमाणात असून शेतकरी कापणीला ही लागले आहेत. मात्र अवेळी पावसाने आपली हजेरी लावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

नुकसान भरपाई देण्याची मागणी 
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर वाढल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीने दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com