
रत्नागिरी: रविवारी रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. यामुळे रत्नागिरीतील अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडलं असून पूरस्थिती निर्माण झालीय. खेड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. खेडच्या मटण मार्केट परिसरात पुराचं पाणी शिरलं आहे. खेड नगर परिषद प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पावसाचा जोर कायम राहिला तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.