Heavy Rain Leaves Farmers Devastated Paddy Cultivation
sakal
पाली - रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, याचा सर्वाधिक फटका किनारपट्टीच्या आणि ग्रामीण भागातील शेती क्षेत्राला बसला आहे. डोंगररांगांमधून वाहून आलेले पाणी आणि नद्यांच्या पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने संपूर्ण जिल्ह्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. भाताची तररलेले रोपे कुजली आहेत. यामुळे वर्षभर संपूर्ण कुटुंबाची गुजराण करणाऱ्या बळीराजाचे डोळे ओले झाले आहेत.