
Malvan Rain Alert : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. वादळी वाऱ्यामुळे काही घरांवर झाडे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही मार्गांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. जोरदार पावसामुळे या भागातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुढील चार-पाच दिवस यलो अलर्ट दिला असून, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.