रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

हातीस येथील भाविकांचे श्राद्धस्थान असलेल्या पीर बाबरशेख दर्गा पाण्याखाली गेला आहे. नाचणे गुरूमळी येथे काजळी नदीचे पाणी घरात घुसले असून बंड्यामोरे यांच्या घरातील सामान ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले.

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काजळी नदीच्या रुद्रावतारात किनाऱ्यावरील चांदिराई, पोमेंडी, सोमेश्वर, हातीस या गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
उक्षी गावामध्ये पाण्याची पातळी वाढली. मशीदीमध्ये शिरले पाणी असून रस्ते बंद झाले आहेत. 

हातीस येथील भाविकांचे श्राद्धस्थान असलेल्या पीर बाबरशेख दर्गा पाण्याखाली गेला आहे. नाचणे गुरूमळी येथे काजळी नदीचे पाणी घरात घुसले असून बंड्या मोरे यांच्या घरातील सामान ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rains in Ratnagiri