दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती आता भारतीय मानांकनाची

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 December 2020

जून 2021 पासून संपूर्ण देशभरात हे आदेश लागू करणार आहेत. 

रत्नागिरी : रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे मृत्यू झाल्याचे प्रमाण अधिक आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे गंभीर दुखापत होऊन मृत्यू प्रमाण वाढत आहे. सध्या कमी दर्जाचे हेल्मेट दुचाकीस्वार वापरत असल्याचे निदर्शनास आले असून यासाठी भारतीय मानांकन (आयएसआय) असलेले हेल्मेट सक्तीचे असल्याचे आदेश केंद्रीय रस्ते सुरक्षा विभागाकडून दिले आहेत. जून 2021 पासून संपूर्ण देशभरात हे आदेश लागू करणार आहेत. 

दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्याचा कायदा केंद्र शासनाच्यावतीने केला होता. मात्र, त्याची सक्तीने अमंलबाजावणी करण्यात येत नव्हती. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता कोरोनाच्या काळात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट वापरण्याची सक्ती केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईमुळे रस्त्यावर मिळणाऱ्या कमी दर्जाच्या हेल्मेट खरेदीकडे स्वारांचा कल असल्याने दिसून आला आहे. अशा प्रकारचे हेल्मेट संरक्षण करण्यास कुचकामी असल्याचे अनेक परीक्षणातून समोर आले आहे. 

हेही वाचा -  मोकाट श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दुर्मिळ पिसुरी हरणाला मिळाले जीवदान -

याच गोष्टींचा विचार करुन केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग विभागाने हेल्मेट वापरण्याबाबत नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आयएसआय 4151 ः 2015 असे मानांकन असलेले हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. याची अमंलबजावणी 1 जून 2021 पासून संपूर्ण देशभरात करणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात येत आहे. 

रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचा वैद्यकीय उपचाराअभावी मृत्यू होऊ नये किंवा कायमचे अपंगत्व येऊ नये, यासाठी कॅशलेस ट्रिटमेट स्कीम अंतर्गत 2 लाख 50 हजारपर्यत मोफत उपचार देण्याची बाब विचाराधीन ठेवण्यात आली आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अपघातग्रस्त रुग्णांना सुरवातीला 72 तासात 30 हजारपर्यतचा खर्च निर्णय घेतल्याची माहिती रत्नागिरी वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

हेही वाचा - थंड हवेच्या ठिकाणांसह, समुद्र किनारे गजबजले - ​
 

भरपाईच्या रक्कमेत सुधारणा 

सध्या मृत्यूमुखी पडणाऱ्यांना 25 हजार रुपये व गंभीर जखमींना 12 हजार 500 रुपये नुकसान भरपाई देण्यात येते. या नुकसान भरपाईच्या रक्कमेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अपघातात मृत्यू होणाऱ्या नातेवाईकांना 2 लाखापर्यत तर जखमींना 20 हजाराची मदत मिळणार आहे.

 

संपादन - स्नेहल कदम  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: helmet compulsory for two wheeler IS nominated in ratnagiri