हेल्मेटमुळे दुचाकीस्वार अपघातातून वाचला

अजय सावंत
Sunday, 10 January 2021

मोटार चालकाने अचानक मोटार वळविल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - पिंगुळी-साईमंदिर येथे मोटार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सुदैवाने हेल्मेटधारी दुचाकीस्वार वाचला. मात्र या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज दुपारी ही अपघाताची घटना घडली.

मोटार चालकाने अचानक मोटार वळविल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली. दुचाकीस्वार रस्त्यावर पडला; मात्र डोक्‍यावर हेल्मेट असल्याने सुदैवाने तो बचावला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह दयानंद चव्हाण, श्री. पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला. दरम्यान, प्रवासात हेल्मेट किती फायदेशीर आहे. याची चर्चा घटनास्थळी होती.

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: helmet saved youth accident kudal konkan sindhudurg