इंधन निर्मितीसाठी आता नवा फंडा

with help of plastic bottles use for to create fuel in ratnagiri the activity by umesh bhide
with help of plastic bottles use for to create fuel in ratnagiri the activity by umesh bhide
Updated on

रत्नागिरी : प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने त्याचा पुनर्वापर करणे हाच पर्याय समोर दिसतो. बिस्किटे, गोळ्या आणि अनेक प्रकारच्या खाऊंचे रॅपर्स टाकून त्याचा कचरा केला जातो. या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयोग निवेंडी येथील उमेश भिडे यांनी घरी सुरू केला. प्लास्टिक रॅपर्स गोळा करून ते प्लास्टिकच्याच बाटल्यांमध्ये साठवले आहेत.

या बाटल्यांपासून काही वस्तू किंवा बांधकाम साहित्यात, इंधननिर्मिती यासाठी उपयोग होऊ शकतो. त्यासाठी संस्था स्थापन करण्याचा भिडे यांचा मानस आहे. या संदर्भात भिडे यांनी सांगितले, एका बाटलीमध्ये खाऊचे सुमारे ५० रॅपर्स राहतात. मागील वर्षी आम्ही बदामीला फिरायला गेलो होतो. दोन दिवसांत आम्ही पाण्याच्या ३० बाटल्या संपविल्या. त्या आम्ही रेल्वे स्टेशनच्या कचराकुंडीत टाकल्या होत्या. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्लास्टिक पिशव्या धुवून त्या प्लास्टिकच्या बाटलीत भरल्या होत्या. ही संस्था या बाटल्या गोळा करून प्लास्टिकपासून इंधन बनविणाऱ्या कारखान्यात नेऊन देतात. हा उपक्रम पाहून मीही घरी अशा पिशव्या बाटल्यांमध्ये भरून ठेवण्यास सुरवात केली. 

भिडे यांनी भाज्या कापून उरलेला भाग, शिल्लक अन्न वगैरे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून घरच्या घरी खत बनवले आहे. शहरात गाड्या फिरवून वेगवेगळा कचरा गोळा केला जातो. सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळा करून त्यावर गृहनिर्माण संस्थांनी प्रक्रिया केल्यास शहराचे आरोग्य 
चांगले राहील.

"लोकांनी जास्तीत जास्त कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी. प्लास्टिक रॅपर्स, पिशव्या बेजबाबदारपणे रस्त्यावर न टाकता त्या घरी साठवून प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात द्याव्यात."

- उमेश भिडे

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com