esakal | लाखो रूपये खर्चून बांधाल्या शाळा, पण शिकण्यासाठी नाहीत विद्यार्थीच ; वाचा विद्यार्थी नसलेल्या शाळांची कथा
sakal

बोलून बातमी शोधा

hexagonal building of school in maharashtra establishment expenses waste and number students also less in kokan

राजापूर तालुक्‍यात 27 शून्य शिक्षकी शाळांमध्ये 4 षट्‌कोनी शाळांचा समावेश आहे.

लाखो रूपये खर्चून बांधाल्या शाळा, पण शिकण्यासाठी नाहीत विद्यार्थीच ; वाचा विद्यार्थी नसलेल्या शाळांची कथा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत लाखो रुपये खर्च करून नवनवीन इमारतींची उभारणी करण्यात आली. त्यामध्ये षट्‌कोनी आकाराच्या आकर्षक अशा शालेय इमारतींचाही समावेश आहे. मात्र शून्य पटसंख्ये असल्याने अनेक शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. त्यामध्ये षट्‌कोनी आकाराच्या इमारतींचाही सामावेश आहे. राजापूर तालुक्‍यात 27 शून्य शिक्षकी शाळांमध्ये 4 षट्‌कोनी शाळांचा समावेश आहे.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! नव्या दुचाकीचे पासिंग होण्याआधीच काळाने घातला घाला

शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल करताना अभ्यासक्रमांसह शाळांचा दर्जा उंचावणे, इमारतींचे स्वरूप बदलणे, जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारतींची बांधकामे करणे, नवीन वर्गखोल्या बांधणे आदी भौतिक सुविधांसह आधुनिक पद्धतीच्या षट्‌कोनी आकाराच्या इमारतीदेखील बांधल्या आहेत. शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असतानाच राजापूर तालुक्‍यात एकूण 27 शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या. तेथील विद्यार्थ्यांची अन्यत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

या शाळा सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सौंदळ शाळा नं. 5 ही तेथील रेल्वेस्थानकापासून जवळ आहे. कोकण रेल्वेच्या गाड्यांतील प्रवाशांचे ती लक्ष वेधून घेते. धावत्या ट्रेनमधून या शाळेचे घेतलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत .रेल्वेस्थानकावरून ती शाळा अधिकच नजरेत भरते पण विद्यमान क्षणी विद्यार्थीच नसल्याने ती बंद करावी लागत आहे. अशी एक शाळा बांधण्यासाठी दहा ते बारा लाखाच्या दरम्यान खर्च येतो. 

हेही वाचा - मुंबईसह कोकणात या दिवशी मुसळधार पाऊस

चार शाळा षटकोनी इमारतींमधील

तालुक्‍यात राजापूर बागकाजी, उर्दू, विखारेगोठणे, धनगरवाडी, धोपेश्वर, तिथवली, गोठणे दोनिवडे नं. 5, वाटूळ नं. 2, ओझर, उर्दू, सौंदळ नं 5, सौंदळ, ठिकाणकोंड, परूळे नं. 1, पाचल नं. 4, करक नं. 4, पांगरीखुर्द नं. 2 (गावठाण), येरडव नं. 2 (गाववाडी), झर्ये नं. 2 (फळसवाडी), केळवली नं. 5, मोरोशी नं. 2, तळगाव मराठी नं. 3, दोनिवडे गौळवाडी, मिठगवाणे नं. 2, अणसुरे नं. 1, देवाचेगोठणे, उंबरवाडी, दसूर, उर्दू, ओझर, धनगरवाडी, मोसम नं. 3, निवेली, सागवे हमदारे शाळा बंद करण्यात आल्या. त्यामध्ये ओझर उर्दू, सौंदळ नं. 5, दसूर उर्दू व ओझर धनगरवाडी या चार शाळा षटकोनी इमारतींमधील आहेत.
 

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top