esakal | मुंबईसह कोकणात या दिवशी मुसळधार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

Meteorological Department Forecast torrential rains with thunderstorms on September 3 and 4.

रत्नागिरी जिल्ह्यात गणपती उत्सवात पावसाने काही अंशी विश्रांती घेतली होती.मात्र

मुंबईसह कोकणात या दिवशी मुसळधार पाऊस

sakal_logo
By
राजेश कळंबट्टे

रत्नागिरी : गणेशोत्सवात विश्रांती घेणारा पाऊस पुन्हा रत्नागिरीत पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 3 आणि 4 सप्टेंबरला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

 
रत्नागिरी जिल्ह्यात गणपती उत्सवात पावसाने काही अंशी विश्रांती घेतली होती.  अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.  पण संततधार नव्हती. काही ठिकाणी कडकडीत ऊनही पडत आहेत. खेड, संगमेश्वर तालुक्यातील काही भागात अचानक पावसाच्या सरी पडत आहेत. परंतु रत्नागिरी, चिपळूण, राजापूर भागात म्हणावा तसा जोर नाही. पावसाच्या विश्रांती मुळे बळीराजा त्रस्त झाला आहे. त्याला दिलासादायक असा अंदाज हवामान विभागाकडून मिळाला आहे.

हेही वाचा- नारळाच्या कलाकृतीतून होत आहे रोजगार निर्मीती ; कोकणकरांचा उपक्रम -


४, ५ आणि ६ सप्टेंबरला रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथे पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल.

दरम्यान आज सकाळी अचानक ढगांचा गडगडाट सुरु झाला होता.  काही ठिकाणी हलका पाऊसही झाला.  परंतु त्यात जोर नव्हता.  दुपारी कडकडीत ऊन पडले आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

संपादन -  अर्चना बनगे