
पक्षाशी चर्चा करून साळवींनी बोलायला हवे होते
उदय सामंत; नाणार रिफायनरी संदर्भातील वक्तव्य
रत्नागिरी : नाणार (ता. राजापूर) रिफायनरीचा विषय अधिसूचना रद्द करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपवला आहे. त्यावर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तीक आहे. तसा खुलासही साळवी यांनी केला आहे. तरी नाणारवर भाष्य करताना साळवी यांनी पक्षाशी चर्चा करून बोलायला हवे होते, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
नाणार रिफायनरीला स्थानिकांचा पाठिंबा असेल तर मुख्यमंत्री त्याचा सकारात्मक विचार करतील, असे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केलेले वक्तव्य त्याना चांगलेच महागात पडले. त्यांच्या वक्तव्यावर पक्षाला खुलासा करावा लागला. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, रिफायनरीची अधिसूचना रद्द करून हा विषय संपवला आहे.
हेही वाचा- तीन दिवस कोकणात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता -
त्यामुळे त्यावर साळवी यांना भाष्य करण्याची आवश्यकता नव्हती. तरी त्यांनी वैयक्तीक मत असल्याचा खुलासा केला आहे. त्यानंतर पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी खुलासा केला आहे. राजन साळवींचे ते वैयक्तीक मत आहे. केंद्रीय मंत्र्यांनीही देखील सर्वांना कोरोनाची मोफत लस देण्याची घोषणा केली आणि ते वक्तव्य संध्याकाळी मागे घेतले, असे कधीतरी होते. साळवींनी पक्षाशी चर्चा करून बोललायला हवे होते, असे सामंत म्हणाले.
संपादन- अर्चना बनगे