कोका-कोला कंपनी 'या' एमआयडीसीत करणार तब्बल 4 हजार कोटींची गुंतवणूक; कंपनीचा राज्य सरकारशी झाला करार

२०१७ मध्ये अमेरिकेत तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कंपनीचा राज्य सरकारशी करार झाला.
Hindustan Coca-Cola Beverage Company
Hindustan Coca-Cola Beverage Companyesakal
Updated on
Summary

देशभरात कोका-कोलाची ६० उत्पादने आहेत आणि यात हजारों कर्मचारी काम करत आहेत.

चिपळूण : अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये (Lote MIDC Chiplun) पहिला प्रकल्प सुरू करणारी हिंदुस्थान कोका-कोला बेवरेज कंपनी (Hindustan Coca-Cola Beverage Company) या परिसरात तब्बल ४ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे भाग्य भविष्यात उजळणार आहे. अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये एवढी मोठी गुंतवणूक करणारी ही पाहिली कंपनी ठरणार आहे.

Hindustan Coca-Cola Beverage Company
Konkan News : मध्याश्मयुगीन काळातील कातळशिल्प 'राज्य संरक्षित स्मारक' म्हणून घोषित; शासनाकडून अधिसूचना जारी

कोका-कोला कंपनीला महाराष्ट्रात कंपनीचा विस्तार करायचा होता. त्या वेळी कंपनीची एक टीम कुडाळ, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, लोटे, महाड, अलिबाग आदी भागातील एमआयडीसीचा सर्व्हे करत होती. या कंपनीला कच्चा माल म्हणून मुबलक प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. लोटे एमआयडीसी कंपनीला आवश्यक तेवढी जागा नाही. त्यामुळे कंपनीने अतिरिक्त एमआयडीसीची निवड केली.

२०१७ मध्ये अमेरिकेत तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कंपनीचा राज्य सरकारशी करार झाला. इतर कोणत्याही अडचणी नसल्यामुळे या भागात कंपनीने विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ७०० कोटी, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात २ हजार ५०० कोटी आणि चौथ्या टप्प्यात ८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने या भागात ३ लाख ६० हजार चौरस मीटरची जागा ताब्यात घेतली आहे. हळूहळू कंपनी आणखी जागा घेणार आहे.

Hindustan Coca-Cola Beverage Company
कोकणात सापडली 40 हजार वर्षांपूर्वीची दगडी हत्यारे; शिकार, जनावरांचं मांस फाडण्यासाठी केला जात होता वापर

देशभरात कोका-कोलाची ६० उत्पादने आहेत आणि यात हजारों कर्मचारी काम करत आहेत. अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये प्रकल्प विस्तारासाठी आणखी जागा हवी. या भागात प्रकल्प विस्तार करण्याचा आमचा मानस आहे.

- नारायण सतिया, नॅशनल हेड, कोका-कोला कंपनी

अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये कोका-कोला कंपनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. आम्ही कंपनीच्या निर्णयाचे स्वागत करतो. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये कंपनी येणार असेल तर कंपनीला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देऊ.

- उदय सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com