Sindhudurg News: ऐतिहासिक निर्णय! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ गावं इको सेन्सिटिव्ह, अंतिम अधिसूचना जारी..

Western Ghats conservation villages in Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ गावं इको सेन्सिटिव्ह घोषित, पर्यावरण संरक्षणाला नवा बळ
Scenic green landscape in Sindhudurg as 25 villages receive eco-sensitive zone status.

Scenic green landscape in Sindhudurg as 25 villages receive eco-sensitive zone status.

sakal

Updated on

बांदा: सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील तब्बल २५ गावांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक असा निर्णय जाहीर झाला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने या गावांना ‘इको सेन्सिटिव्ह एरिया’ म्हणून घोषित करणारी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे परिसरातील पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या खाणकाम प्रकल्पांना, तसेच लाल श्रेणीतील प्रदूषणकारी उद्योगांना अधिकृतपणे आळा बसणार आहे. वन शक्ती संस्थेने मुंबई उच्च न्यायालयालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयानुसार ही प्रक्रिया झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com