

kankavali kalmath grampanchayat
esakal
Kanakavali Village News : पतीच्या निधनानंतर स्त्रीचे सौंदर्य हिरावून घेणाऱ्या आणि तिला आयुष्यभर सामाजिक बंधनांत अडकवणाऱ्या विधवा प्रथेला ठाम नकार देत कलमठ (ता. कणकवली) ग्रामपंचायतीने माणुसकीला होकार देणारा महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ज्या घरामध्ये विधवा प्रथा पाळली जाणार नाही, अशा कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय कलमठ ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी घेतला आहे.