
पाली : रायगड जिल्ह्यातील प्रथम बौद्ध भिक्कू, भंते संघकीर्ती महाथेरो यांच्या मुळ गावी उत्कर्षनगर, झाप पाली, ता. सुधागड येथील स्मृती स्मारकास शनिवारी (ता. 23) श्रीलंकेतील बौद्ध भंतेंनी ऐतिहासिक भेट दिली. भन्ते आनंद महाथेरो (श्रीलंका), भन्ते अनिरुद्ध थेरो (श्रीलंका), भन्ते आधीचित्तो (कर्जत) व भन्ते आर्यधम्म (श्रामनेर) यांनी ऐतिहासिक भेट दिली.