

353rd Shivrajyabhishek Day celebration held at Raigad Fort with Eknath Shinde
Sakal
महाड : रायगडाच्या कड्याकपारीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला. तुतारींची ललकारी आणि ढोलताशांच्या गजरात राजसदर दणाणले. विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रघोषाने मंगलमय झालेल्या रायगडावरील वातावरणात रायगडावर आज तिथीनुसार 353 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.