जाणून घ्या.... राजापूरातील ऐतिहासिक गढी

Historical Treasury Coins Information In Rajapur Rajapur Marathi News
Historical Treasury Coins Information In Rajapur Rajapur Marathi News

राजापूर (रत्नागिरी) : राजापूरची इंग्रजांची गढी सर्वांनाच ज्ञात आहे. या गढीच्या तळमजल्यावर ट्रेझरी व पोलिस ठाणे अमलदार यांचे ऑफिस होते. बॅंकेने आणलेली रोकड, चिल्लर ट्रेझरी ऑफिसर मोजून घेत असे. नाणे खरे की खोटे, याची शहानिशा करण्याची एक विशेष पद्धत होती. त्यासाठी विशिष्ट दगड वापरत असत. तोच कसोटीसाठी वापरत, अशी माहिती धनंजय मराठे यांनी दिली. 

राजापूरच्या गढीतील ट्रेझरीमध्ये आजच्या काळासारखी त्या काळी इलेक्‍ट्रॉनिक मशीन नव्हती, तर विशिष्ट प्रकारची लोखंडी धातूची अंडाकृती 13 सेंटीमीटर लांब, 9.5 सेंटीमीटर रुंद, 1.75 सेंटीमीटर जाड अशी लोखंडी प्लेट होती. त्या प्लेटच्या पृष्ठभागावर मध्यभागी तीन व्यासाचे काळसर सपाट पृष्ठभाग असलेला दगड बसवलेला असे. हा दगड म्हणजेच कसोटी. या ट्रेझरीमध्ये सरकारी खजिना, धन आदी ठेवले जात होते. 


कुलूप काढणे म्हणजे दीव्य
त्यावेळी राजापुरात असणाऱ्या अर्बन बॅंक व आरडीसीसी बॅंकेव्यतिरिक्त कोणतीच बॅंक नव्हती. या बॅंकेची रोकड ट्रेझरी ऑफीसमध्ये ठेवावी लागे. तळमजल्यावरील ट्रेझरीमध्ये एक भला मोठा साधारण बारा फूट लांब, सहा फूट रुंद तर पाच फूट उंच असा अडीच-तीन इंच जाडीच्या फळ्यांपासून बनवलेला लाकडी पेटारा होता. त्याचे झाकण उघडायचे म्हणजे ते एक दिव्यच. प्रथम आढात कडीचे भलेमोठे कुलूप व त्यावरील असणारे लाखेचे सील काढून किल्ली लावून उघडावे लागे. 

क्लिक करा -अँड्रेस हाऊजर औरंगाबादेत करणार 200 कोटींची गुंतवणूक

पेटाऱा उलघडण्याचे तंत्र
मग लोखंडी कडी दोन हातांनी सरकवून पेटाऱ्याच्या आतील भागातील कुलूप 4 ते 5 चाव्यांनी उघडावे लागे. पेटाऱ्यावरील छताला असलेल्या कप्पिला दोरखंड ओवून पेटाऱ्याच्या झाकणाला त्या अडकवलेल्या असत. पेटारा उघडायचा झाला की कप्पीतून अडकवलेली दोरी ओढली की, झाकण उघडायचे. झाकणाला आतून दोन फोल्डिंग आढात/लाकडी खांब होते. ते खांब पेटाऱ्याच्या आतील भागात टेकून झाकणाला उघडे ठेवत असे. त्यात धन ठेवले जात असे. 

नाण्याची परीक्षा 
कसोटी दगड म्हणजे सोनारांकडे चांदी, सोन्याची शुद्धता पारखण्यासाठी असणारी वस्तू. या प्लेटच्या वरील कडेच्या अर्ध चंद्राकृती बाजूवर डोनाल्ड सीओ (donald & co), तर खालील बाजूवर बॉम्बे (bombay) असे इंग्रजीत ठळक मजकूर कोरलेला असे. नाणे त्या दगडावर ठराविक अंतरावरून अलगद सोडून त्याचा होणारा नाद, आवाज यावरून ते नाणे खरे की खोटे समजायचे. आणखी खात्री पटवायची असेल तर मध्यभागी असलेल्या कसोटीवर नाणे घासून त्याची परीक्षा केली जात असे. अशा ऐरणी मोठ्या व्यापाऱ्यांकडे असत. आता ते 'अँटीक पीस' सदरात मोडतील, असे मराठे यांनी सांगितले.  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com