अँड्रेस हाऊजर औरंगाबादेत करणार 200 कोटींची गुंतवणूक

प्रकाश बनकर
Saturday, 4 January 2020

मूळ स्वित्झर्लंडची कंपनी असलेली अँड्रेस हाऊजर फ्लोटेक (इंडिया) प्रा. लि.ला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष 1999 मध्ये औरंगाबादेत स्थापना झाली. उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेऊन अँड्रेस हाऊजर फ्लोटेक (इंडिया) कंपनी विस्तार वाढविणार आहे. यासाठी 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे

औरंगाबाद : अँड्रेस हाऊजर फ्लोटेक इंडिया या इन्स्ट्रुमेंट तसेच त्यांचे सुटे भाग तयार करणारी वाळूज एमआयडीसीतील कंपनी देशाअंतर्गत आणि परदेशातून आपल्या उत्पादनाची निर्यात करते. उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेऊन अँड्रेस हाऊजर फ्लोटेक (इंडिया) कंपनी विस्तार वाढविणार आहे. यासाठी 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे रोजगार निर्मितीही वाढणार आहे. भविष्याचा वेध घेत हा विस्तार करण्यात येत असल्याची माहिती कंपनीने व्यवस्थापकीय संचालक बर्न जोसेफ स्काफर यांनी शुक्रवारी (ता.3) पत्रकार परिषदेत दिली. 

मूळ स्वित्झर्लंडची कंपनी असलेली अँड्रेस हाऊजर फ्लोटेक (इंडिया) प्रा. लि.ला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष 1999 मध्ये औरंगाबादेत स्थापना झाली. या कंपनीत इलेक्‍ट्रिक मॅग्नेटिक फ्लोमीटर, कोरियोलिस, मास फ्लोमीटर, वोर्टेक्‍स आणि अल्ट्रासोनिक फ्लोमीटर उत्पादित करून ते देशभरासह ऑस्टेलिया, दक्षिण आफ्रिका, अरब अमिराती, यूएई, दक्षिण अमेरिका देश, जापान, अशा 15 देशांत हे उत्पादन निर्यात केले जाते.

हेही वाचा : मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!

श्री. बर्न जोसेफ स्काफर म्हणाले, की औरंगाबादच्या कंपनीला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. या कंपनीची सुरवात शून्यापासून सुरू केली होती. आज कंपनीची वार्षिक उलाढाल 350 कोटींपर्यंत आहे. नव्या विस्तारानुसार ही उलाढाल पुढील पाच वर्षांत एक हजार कोटींच्या घरात घेऊन जाणार आहे. काही कर्मचाऱ्यांवर सुरू झालेली ही कंपनी 130 अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोचली आहे.

हेही वाचा : औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके

आशिया खंडातील फ्लोमीटर आणि त्यासंदर्भातील सोल्युशन अँड्रेस हाऊजर फ्लोटेक इंडिया आघाडीची कंपली बनली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांपैकी 99 टक्‍के लोक हे स्थानिक आहेत. या विस्तारामुळे आणखी रोजगार वाढणार आहेत. यावेळी कंपनीचे अध्यक्ष व संचालक के.कुमार व श्री. चितळे उपस्थित होते. कंपनीला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी ! 

दहा विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण 
कंपनीतर्फे व्हीईटीअंतर्गत आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना इंड्रस्ट्रियल्स ट्रेनिग देण्यात येते. एक वर्षासाठी हे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना देण्यात येते. या मुलांना प्रशिक्षित केले जाते. यातील सहा विद्यार्थ्यांना याच कंपनीत नोकरी देण्यात आली आहे. यासह चार विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ट्रेन करण्यात आले आहे, की त्यांना कुठल्याही कंपनीत नोकरी मिळेल, अशी माहिती श्री. के. कुमार यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andres Houser will Invest Rs 200 crore