esakal | घर, फ्लॅट, जमिन खरेदी तेजीत; चार महिन्यात कोटींचा व्यवहार
sakal

बोलून बातमी शोधा

home loan

घर, फ्लॅट, जमिन खरेदी तेजीत; चार महिन्यात कोटींचा व्यवहार

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी: हक्काचे घर, फ्लॅट, जमिनी खरेदीसाठी पुन्हा उड्या पडू लागल्या आहेत. कोरोना (Covid 19) महामारीतून सावरतानाचे हे चित्र आहे. रत्नागिरी (ratnagiri) तालुक्यात गेल्या चार महिन्यांमध्ये खरेदी-विक्री व्यवसाय तेजीत आहे. महामारीतीलचार महिन्यातही १ हजार ११५ खरेदी व्यवहारांची (दस्त) नोंद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाली आहे.या दस्तांच्या माध्यमातून सुमारे ५ कोटीचा मुद्रांक शुल्क शासनाला प्राप्त झाला आहे; मात्र दरवर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करणे या परिस्थितीत शक्य दिसत नाही.

कोरोना महामारीच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात टाळेबंदी झाली आणि त्याचा मोठा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला. यामध्ये बांधकाम व्यवसाय आणि रिअल इस्टेटवरही मोठा परिणाम झाला. मंदीचे सावट असल्याने हजारो फ्लॅट, बंगलो आदींच्या खरेदीवर परिणाम झाला. ज्या तुलनेत बिल्डरांनी गुंतवणूक केलीआहे. त्या तुलनेत ब्लॉक विक्री झालेली दिसत नाहीत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरल्यानंतर गेल्यावर्षी शासनाने या कार्यालयाला ३३ कोटीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ८६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले होते.रत्नागिरी तालुक्यात घरे, फ्लॅट,जमीन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. मार्च २०२१ एका महिन्यात रत्नागिरी तालुक्यात ९१९ खरेदी व्यवहार झाले.या व्यवहारातून शासनाला २ कोटी ९४ लाख ७९ हजाराचा मुद्रांक शुल्क मिळाला. एप्रिल महिन्यात २२० खरेदींच्यामाध्यमातून १ कोटी २६ लाख , मे महिन्यात ७१ खरेदींमध्ये ४७ लाख ७३ हजार ३९५ तर जून महिन्यात मात्र खरेदी व्यवसाय पुन्हा तेजीत आला आहे. ३०५ खरेदी झाल्या असून १ कोटी ३४ लाख ३० हजार मुद्रांक शुल्क मिळाला.

हेही वाचा- राणेंना पद; पण शिवसेनेला बळ

दरवर्षी मे आणि एप्रिल महिन्यात ७०० ते ८०० खरेदी व्यवहार होतात; मात्र महामारीमुळे यावर ५० ते ६० टक्के परिणाम झाला आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे गेल्या महिन्यापासून खरेदीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पहिल्या लाटेतून सावरताना मार्च महिन्यात हजारच्या दरम्यान खरेदी व्यवहार झाले. महसूलही सर्वांत जास्त सुमारे ३ कोटीचे मुद्रांक शुल्क मिळाले. त्यानंतर दुसऱ्या लाटेचा चांगलाच परिणाम खरेदीवर झाला. एप्रिल, मे महिन्यात कमी प्रमाणात खरेदी झाली. आता जून महिन्यात पुन्हा खरेदी व्यवसायात वाढ झाली आहे.

मार्च महिन्यातील खरेदी -९१९

मिळालेला मुद्रांक शुल्क २ कोटी ९४ लाख ७९ हजाराचा

एप्रिल महिन्यात खरेदी -२२०

मुद्रांक शुल्क १ कोटी २६ लाख

मे महिन्यात खरेदी -७१

मुद्रांक शुल्क ४७ लाख ७३ हजार ३९५

जून महिन्यात खरेदी -३०५

मुद्रांक शुल्क १ कोटी ३४ लाख ३० हजार

दुय्यम निबंधक विभागाला २०१९-२० चे उद्दिष्ट- ४८ कोटी

वसुली- ३० कोटी ६० लाख

६३ टक्के वसुली पूर्ण

दुय्यम निबंधक विभागाला २०२१ चे उद्दिष्ट ३३ कोटी

वसुली- २८ कोटी ६१ लाख

८६ टक्के उद्दिष्ट पूर्ण

loading image