esakal | राणेंना पद; पण शिवसेनेला बळ; केसरकरांकडून आधीच शाश्वत विकास
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

राणेंना पद; पण शिवसेनेला बळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : ज्यांना शिवसेनेने तीन वेळा पराभूत केले, त्यांना मंत्रिपद देऊन आमच्या विरोधात लढण्यास उतरवणे हेच मुळात हस्यास्पद आहे. ही शिवसेनेची ताकद वाढल्याची प्रचिती आहे. आताच्या भाजपला आमच्या विरोधात लढण्याचे बळ उरले नाही, अशी टीका शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केली. सुक्ष्म खाते दिले म्हणजे विकास झाला असे नाही, उलट आमदार दीपक केसरकर यांनी यापूर्वीच मंत्रिपदाच्या काळात जिल्ह्याचा शाश्वत तसेच सुक्ष्म विकास साधल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

सावंतवाडी मळगाव येथे आयोजित प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, सह संर्पकप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, मतदार संघसर्पक अध्यक्ष विक्रांत सावंत, जिल्हा परीषदेतील गटनेते नागेंद्र परब, नगरसेवक जयेंद्र परूळेकर, तालुकाप्रमुख रूपेश राउळ, बाबूराव धुरी, यशवंत परब, बाळा दळवी आदी उपस्थित होते.

राऊत म्हणाले, ‘केंद्राकडून नवीन सहकार खाते निर्माण करून एक प्रकारे महाराष्ट्रातील सहकार मोडीत काढण्याचे काम सुरू केले असून सहकार मंत्रालयाकडून ईडीच्या माध्यमातून सहकारावर घाला घालण्याचे काम सुरू आहे. तुम्ही कितीही जणांच्या मागे ईडी लावा; पण सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. राणेंना मंत्रीपद देणे म्हणजे शिवसेनेची ताकद वाढल्याची प्रचिती भाजपच्या नेत्यांना आली असून आपणास लढायला जमत नाही, म्हणूनच राणेंना मंत्री करून पुढे केले आहे.’’

सहसंपर्क प्रमुख दुधवडकर यांनी आगामी निवडणूका या सर्वांनी एक दिलाने लढवणे गरजेचे असून कार्यकर्ता टिकला तरच संघटना टिकत असते. त्यामुळे सर्वांनी मिळून काम करूया व आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयांची पताका फडकूया, असे सांगितले. जिल्हाप्रमुख संजय पडते, जान्हवी सावंत, डॉ. परूळेकर आदींनी आपले विचार मांडले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही आपली गाऱ्हाणी खासदार यांच्याकडे माडत संघटनेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.

हेही वाचा- रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली

गटतट विसरा

आमदार केसरकर म्हणाले, ‘पक्ष वाढवायचा तर आता गट तट विसरून बाहेरून येणाऱ्यांना पक्षात स्थान दिले पाहिजे तरच पक्षाची ताकद वाढेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकारपेक्षा संघटना वाढणे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे असून सरकारच्या माध्यमातून होणारा विकास हा सर्वसामान्य जनतेपर्यंत न्या. माझ्या काळात अधिकचा विश्वास हा अधिकाऱ्यांवर ठेवला, त्यामुळे संघटनेकडे दुर्लक्ष झाले. यापुढे असे होणार नाही. शिवसेनेत शाखा प्रमुख महत्वाचा घटक आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला पांयडा आहे. तसेच काम करूया.

loading image