सावंतवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सावंतवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

89172

सावंतवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

‘आरपीडी’मध्ये सोहळा ः डॉ. आंबेडकर समाज प्रबोधन समितीचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समितीमार्फत येथील आर.पी.डी. हायस्कूलच्या सभागृहात रविवारी (ता. ९) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रमुख मार्गदर्शक महेंद्र अॅकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष केशव जाधव होते. व्यासपीठावर सायली फाउंडेशनचे प्रा. सचिन पाटकर, सावली पाटकर, ‘वंचित’चे अध्यक्ष महेश परुळेकर, आय.टी.आय.चे निर्देशक रामचंद्र जाधव, बार्टीचे समता दूत सगुण जाधव, ‘बामसेफ’चे जिल्हाध्यक्ष भालचंद्र जाधव, ‘सामाजिक बांधिलकी’चे रवी जाधव, चित्रपट कलाकार विवेक वाळके, उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, सचिव विनायक जाधव. सामाजिक कार्यकर्त्या भावना कदम, मीनाक्षी तेंडुलकर, विनायक कांबळे, मधुकर जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. पाटकर व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण म्हणून करण्यात आले. लक्ष्मण कदम यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नामदेव कदम यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सिमरन तेंडुलकर, चिन्मय असनकर या विद्यार्थ्यांनी आपल्या सत्काराबाबत कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्ष केशव जाधव यांनी या कार्यक्रमात सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा उल्लेख करून भविष्यात आभार व्यक्त केले. सगुण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी तालुक्यातील बहुजन समाजातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
स्पर्धा परीक्षेबाबतही मार्गदर्शन
यावेळी श्री. पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले. आय.टी.आय.चे निर्देशक रामचंद्र जाधव यांनी सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘आयटीआय’चे महत्त्व व त्याअंतर्गत विविध अभ्यासक्रम सांगितले. त्यासाठी लागणारी पात्रता व त्यातून मिळणाऱ्या विविध संधी याबाबतचे मार्गदर्शन केले. विनायक जाधव यांनी बार्टी, सारथी यासारख्या संस्थांचे आपल्या जिल्ह्यात केंद्र व्हावे, असे आवाहन करत इंजिनीअरिंग व त्या अनुषंगाने अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन केले. जगदीश चव्हाण, महेश परूळकर यांनीही मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com