esakal | ओणी-तिसेवाडीत भूस्खलनाने घर गाडले गेले जमिनीत
sakal

बोलून बातमी शोधा

ओणी-तिसेवाडीत भूस्खलनाने घर गाडले गेले जमिनीत

राजापूर - ओणी-तिसेवाडी येथे सोमवारी दुपारपासून जमीन खचण्याचा प्रकार सुरू झाला होता. यामुळे या ठिकाणी असणाऱ्या भारती व हातणकर यांच्या तीन घरे व गोठ्यांना धोका निर्माण झाला होता. मध्यरात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन तीन पैकी एक घर पूर्णपणे जमिनीत गाडले गेले, तर अन्य दोन घरांना आणि गोठ्यांनाही भेगा पडल्या आहेत.

ओणी-तिसेवाडीत भूस्खलनाने घर गाडले गेले जमिनीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर - ओणी-तिसेवाडी येथे सोमवारी दुपारपासून जमीन खचण्याचा प्रकार सुरू झाला होता. यामुळे या ठिकाणी असणाऱ्या भारती व हातणकर यांच्या तीन घरे व गोठ्यांना धोका निर्माण झाला होता. मध्यरात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन तीन पैकी एक घर पूर्णपणे जमिनीत गाडले गेले, तर अन्य दोन घरांना आणि गोठ्यांनाही भेगा पडल्या आहेत.

सोमवारी दुपारपासूनच जमीन खचत असल्याने ही तिन्ही कुटुंबे सावध झाली होती. त्यांनी सोमवारी (ता.5 ) रात्री मुक्काम लगतच्या प्रवीण हातणकर यांच्या घरी हलविला होता. या तीन घरांत मिळून एकूण आठ माणसे होती. मात्र, रात्री मुक्कामासाठी हे सर्वजण लगतच्या घरात गेल्याने सुदैवाने बचावले आहेत. जमीन खचू लागताच गोठ्यातील पाचही जनावरे सोडून देण्यात आली. त्यामुळे ती बचावली आहेत. सुरेश यशवंत भारती व गंगाई तुकाराम भारती यांचे घर पूर्णपणे खचले असून जमिनीत गाडले गेले आहे.

रघुनाथ पुणाजी हातणकर व त्रुशाल तुकाराम हातणकर यांच्या घराला भेगा पडल्या असून काही भाग खचला आहे. रघुनाथ हातणकर यांच्या कुटुंबात त्यांच्यासह रेश्‍मा रघुनाथ हातणकर, सचिन पुनाजी हातणकर असे तीनजण, तर त्रुशाल यांच्या घरात त्यांच्यासह त्रुशाली व तेजस्वीनी असे तीनजण राहात होते. मात्र, हे सर्वजण शेजाऱ्यांकडे मुक्कामास असल्याने सुरक्षित आहेत. या घरांचे व आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

राजापूर पोलिस स्थानकातून पोलिस कॉंस्टेबल वाघाटे, पाटील हे तत्काळ घटनास्थळी पाहचले होते. महसूल प्रशासनाकडूनही तत्काळ या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले 

स्थानिकांनी धाव घेत केली मदत 
मध्यरात्रीपासून घराजवळील जमीन खचत असल्याचे कळताच या भागातील तरुण भारत राघव, प्रवीण राघव यांच्यासह गावातील स्थानिकांनी या ठिकाणी धाव घेत आपदग्रस्तांना मदत केली. मंगळवारी सकाळी याबाबतचे वृत्त कळताच नेरकेवाडी पोलिस पाटील सचिन मांडवकर, नेरकेवाडी उत्कर्ष मंडळ ग्रामीणचे सचिव प्रदीप मोहिते, ओणी सरपंच, पोलिस पाटील संजय लिंगायत यांसह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. 
 
loading image