गणेशोत्सवसाठी घोषीत टोल माफीचा फायदा किती जणांना ? 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

कोरोनाचा कितीही मोठा प्रभाव असला तरी कोकणात गणेशोत्सवची धामधुम सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा क्वारंटाईन 14 दिवसांवरुन 10 दिवस केला आहे. तसेच 12 ऑगस्टनंतर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींना 48 तासाच्या आठ कोरोनाची टेस्ट करून घेणे आवश्‍यक आहे.

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - गणेशोत्सवसाठी कोकणात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली आहे; मात्र गणेशोत्सव पूर्वी दोन दिवस येणाऱ्या चाकरमान्यांना याचा लाभ घेता येणार आहे; परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर 12 ऑगस्टपासून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट करून आल्यावर सुद्धा तीन दिवस क्वारंटाईन राहण्याचे बंधन आहे. त्यामुळे टोल माफीचा फायदा येणाऱ्या चाकरमान्यांना होणार नसून जाणाऱ्या चाकरमान्यांना होणार आहे. त्यामुळे किमान आठ दिवस अगोदर ही टोल माफी आवश्‍यक होती. 

कोरोनाचा कितीही मोठा प्रभाव असला तरी कोकणात गणेशोत्सवची धामधुम सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा क्वारंटाईन 14 दिवसांवरुन 10 दिवस केला आहे. तसेच 12 ऑगस्टनंतर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींना 48 तासाच्या आठ कोरोनाची टेस्ट करून घेणे आवश्‍यक आहे. ती टेस्ट निगेटिव्ह असल्यास जिल्ह्यात प्रवेश आहे; मात्र निगेटिव्ह टेस्ट घेवून आले तरी तीन दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. 

राज्य शासनाने 13 ऑगस्टला गणेशोत्सवसाठी कोकणात येणाऱ्या नागरिकांना टोल माफी जाहीर केली आहे; मात्र ही टोल माफी येणाऱ्यासाठी गणेशोत्सव पूर्वी दोन दिवस मिळणार आहे. 22 ऑगस्टला गणेशोत्सव आहे. त्यामुळे 20 आणि 21 ऑगस्टला याचा लाभ घेता येणार आहे. टोल माफी घेवून या दिवसांत चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले तर त्यांना कोरोना नियमाप्रमाणे तीन दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवचा पहीला व पुढील काही दिवस त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे येणाऱ्या चाकरमान्यांसाठी याचा काहीच उपयोग नाही. 

परतीच्या प्रवासास फायदा 
शासनाने ही टोल माफी जाहीर करताना गणेशोत्सवपूर्वी किमान आठ दिवस अगोदर कालावधीसाठी जाहीर करणे आवश्‍यक होते. गणेशोत्सव दोन दिवस पूर्वी कालावधीसाठी जाहीर केलेली टोल माफी प्रत्यक्षात चाकरमान्यांना किती फायद्याची ठरणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे; मात्र गणेशोत्सवानंतर दोन दिवसांसाठी जाहीर केलेली टोल माफी निश्‍चितच चाकरमान्यांना परतीचा प्रवास करताना फलदायी ठरणारी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How Many Mumbai Serviceman Benefit From Toll Waiver Announced For Ganeshotsav