Raigad News : चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात विघ्न; पाली खोपोली राज्य महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

पाली खोपोली राज्य महामार्ग हा मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला तसेच मुंबई गोवा महामार्गाला जोडतो.
Huge traffic jam on Pali Khopoli State Highway return from konkan
Huge traffic jam on Pali Khopoli State Highway return from konkansakal
Updated on

पाली : पाली खोपोली राज्य महामार्ग हा मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला तसेच मुंबई गोवा महामार्गाला जोडतो. त्यामुळे गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी या मार्गाचा अधिक वापर होतो. परंतु रविवारी (ता.24) या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. कोकणातून मुंबई ठाणे व पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.

पाली फाट्यापासून (खोपोली) ते पाली व वाकण पर्यंतच्या ४४ किमी मार्गाचे नुकतेच रुंदीकरण झाले आहे. त्यामुळे परतीच्या मार्गावरुन निघालेल्या भाविकांना या मार्गावरून प्रवास करणे दिलासादायक होते.

या मार्गावर हजारो वाहनांची पहाटेपासून वर्दळ आहे. मात्र या मार्गावर पाली, पेडली, जांभूळपाडा, परळी, पाली फाटा, मिरकूटवाडी आदि ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या 5 ते 6 किमीच्या रांगा लागल्या होत्या.

Huge traffic jam on Pali Khopoli State Highway return from konkan
Raigad News : आवक घटल्‍याने केळीच्या दरात वाढ

नियमांचे पालन न करणारे व ओव्हरटेक करणारे वाहनचालक, काही ठिकाणी असणारा अरुंद रस्ता आणि काही ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे वाहतूक कोंडी जटिल झाली होती. तसेच या मार्गावर उंबरे गावापासून पुढे, गोंदाव फाटा, भालगुल पूल, जांभूळपाडा पुलाच्या पुढे आदी ठिकाणी खड्डे पडले आहेत.

वाहतूक कोंडीमुळे अवघे काही किमीचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना अर्ध्या ते एक तासांहून अधिक वेळ लागत होता. या मार्गवर स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने महिला वृद्ध व लहान मुलांचे हाल झाले. याशिवाय मुंबई गोवा महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com