ब्रेकिंग ; रत्नागिरीत सायंकाळपर्यंत कोरोनाची शंभरी पार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

रत्नागिरी -  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ सुरू असतानाच आज सर्वाधिक म्हणजे गेल्या 24 तासात  प्राप्त अहवालांमध्ये 102 नवे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1438 झाली आहे. तर पाच जणांनाच मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडण्याच प्रमाण कमी होते. मात्र गुरुवारी 24 तासात 102 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हा कोव्हीड रुग्णालय 24 रुग्ण, 
उपजिल्हा रुग्णालय, कामथे- 48 रुग्ण,  दापोली  2, घरडा, खेड 27 तर लांजातील एकाचा समावेश आहे. 

राजापूर येथील एका 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा, तसेच रत्नागिरी येथे 68 वर्षीय ॲन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. खेड येथे 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांचे अनुक्रमे वय 71 व 40 वर्षे अशी आहेत. चिपळूण येथे  49 वर्षीय कोरोना रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 49 झाली आहे.

हे पण वाचा - सुस्कारा : आ वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह..कोणाचे वाचा

दरम्यान 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 858  झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये  जिल्हा कोव्हीड रुग्णालय 6, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली  3,  कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 21, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर, गुहागर 3 आणि  10 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण मधील आहेत.

 

सायंकाळपर्यंतची स्थिती 

 पॉझिटिव्ह - 1438

 बरे झालेले  - 858

 मृत्यू  - 49

एकूण ॲक्टीव्ह - 531

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hundred new corona positive in ratnagiri