चार चाकी गाड्यांसाठी इंधन म्हणून हायड्रोजन; कळमकर यांचे संशोधन

प्रा. रोहन कळमकर यांनी प्रक्रिया करून हायड्रोजन वायूचा चार चाकी गाड्यांच्या बॅटरीचे इंधन म्हणून वापर करता येईल, असे संशोधन केले आहे.
Hydrogen-Fuel
Hydrogen-Fuelsakal

चिपळूण : घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. रोहन कळमकर यांनी प्रक्रिया करून हायड्रोजन (Hydrogen) वायूचा चार चाकी गाड्यांच्या बॅटरीचे इंधन म्हणून वापर करता येईल, असे संशोधन केले आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासावर आता पीएचडीची मोहर विद्यापीठाने उमटवली आहे. हायड्रोजन वायूच्या अशा वापराने कोणतेही प्रदूषण होत नाही, हे महत्त्वाचे. त्यामुळे त्यानी केलेल्या संशोधनाचे आगळे महत्त्व आहे. हायड्रोजन मूळ वायू स्वरूपात वापरणे कठीण आणि धोक्याचे असते.

त्यामुळे खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये कार्यरत असलेल्या प्रा. रोहन कळमकर यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. "इन्व्हेस्टिगेशन ऑफ कन्ड्युसिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड स्टेट मटेरिअल्स फॉर हायड्रोजन स्टोरेज फॉर मोबाईल ऍप्लिकेशन्स" या विषयात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे पदवी प्रदान करण्यात आली.

Hydrogen-Fuel
सोलापूर : 31 एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा; 11 बडतर्फ

आपल्या संशोधनाबद्दल माहिती सांगताना प्रा. कळमकर यांनी सांगितले की, चारचाकी गाडीत फ्युएल सेल बॅटरी असतेच. ती वीज उत्पादन करते आणि विजेवरील गाडी चालते. आपल्या वातावरणात हायड्रोजन भरपूर आहे. या बॅटरीसाठी हायड्रोजनचा वापर केला आहे. मात्र वायुरूपात तो घातक असतो. त्याचा स्फोटही होऊ शकतो. त्यामुळे इंधन म्हणून त्या रूपात तो वापरणे हे अशक्य असते. तसेच त्याचा साठा करणे हेही आव्हान असते.

यासाठी हायड्रोजन वायूचे रासायनिक प्रक्रियेद्वारे पावडरमध्ये रूपांतर करावयाचे, नंतर ही पावडर एका टँकमध्ये साठवायची, (या रूपात हायड्रोजन साठवणे अगदीच निर्धोक असते.) त्याला उष्णता दिली की पावडरच्या रूपातील हायड्रोजनचे रूपांतर वायूत होते आणि तो थेट बॅटरीला पुरवला जातो. यामुळे कोणताही धोका राहात नाही.

प्रा. कळमकर यांचे अनेक शोधनिबंध जागतिक स्तरावर प्रकाशित झाले आहेत. जागतिक संशोधन परिषदेतदेखील त्यांनी केलेल्या संशोधनाचे कौतुक झाले आहे.महाविद्यालयीन प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासाचा समाजासाठी उपयोग होतो तेव्हा तो अभ्यास अधिक महत्त्वाचा ठरतो. अशा प्रकारे सर्वसामान्य जीवनाशी उपयुक्त असे कार्य केल्याबद्दल महाविद्यालयामध्ये तसेच समाजाच्या विविध स्तरातून प्रा. रोहन कळमकर यांचे अभिनंदन होत आहे.

*प्रदूषणाची थोडीही शक्यता नाही

*पेट्रोलपेक्षा तिप्पट अॅव्हरेज

*इस्त्रो आणि टाटांनी घेतली दखल

*मोठ्या बसमध्ये वापरण्याचे प्रयोग सुरू

या संशोधनादरम्यान मला जीआयटीच्या सर्व प्राध्यापक व विश्वस्तांचे सर्वतोपरी साह्य झाले. पत्नी, आई, कुटुंबीय, मित्रपरिवार या साऱ्यामुळे हे संशोधन करू शकलो.

-प्रा. रोहन कळमकर

Hydrogen-Fuel
पुणे : जम्बो रुग्णालय सोमवारपासून पुन्हा कार्यान्वित करणार

द्रवरूप वापरणे गाडीसाठी तरी अशक्य

प्रा. कळमकर पुढे म्हणाले की, हायड्रोजनचे द्रवरूप वापरणे गाडीसाठी तरी अशक्य ठरते. कारण ते साठवण्यासाठी क्रायोजेनिक तापमान लागते. म्हणजेच शून्य अंशाखालील तापमान गाडी चालवताना सांभाळणे केवळ अशक्य आहे. त्यापेक्षा पावडर रूपात हायड्रोजन वापरणे पूर्णपणे निर्धोक आणि वापरायला सोपे ठरते. शिवाय या इंधनाने अॅव्हरेज पेट्रोलपेक्षा तिप्पट मिळते.

पाणी बाहेर टाकले जाते

हायड्रोजन इंधन म्हणून वापरताना तो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यामध्ये विभागला जातो. त्यापैकी प्रोटॉनचा हवेशी संयोग झाला की पाणी तयार होते. त्यामुळे एक्झॉस्टमधून पाणी बाहेर पडते. वेगळा झालेला इलेक्ट्रॉन हा ऊर्जा निर्माण करतो. त्यावर गाडी चालते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com