Ichalkaranji Textile Industry: १५ हजार एअरजेट लूम आठवड्यातून एकदा २४ तास बंद; वस्त्रोद्योगातील मंदीचा जबर आर्थिक फटका कमी करण्यासाठी असोसिएशनचा निर्णय

15,000 Airjet Looms to Remain Shut Once a Week: वस्त्रोद्योगातील मंदीमुळे इचलकरंजीतील सुमारे १५ हजार एअरजेट लूम आठवड्यातून एकदा २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Ichalkaranji Textile Industry: १५ हजार एअरजेट लूम आठवड्यातून एकदा २४ तास बंद; वस्त्रोद्योगातील मंदीचा जबर आर्थिक फटका कमी करण्यासाठी असोसिएशनचा निर्णय
Updated on

इचलकरंजी: वस्त्रोद्योगातील मंदीचा जबर आर्थिक फटका बसत असल्यामुळे शहर व परिसरातील सुमारे १५ हजार एअरजेट लुम आठवड्यातून एकदा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहेत. दर सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एअरजेट लूमचे ३६० युनिट बंद राहणार आहेत. यामागे कापड उत्पादन घटविण्याचा उद्देश असून, यामुळे कापडाला मागणी व दर येईल, अशी आशा आहे. या परिस्थीतीत सुधारणा न झाल्यास पुढील काळात बंद ठेवण्याच्या कालावधीत वाढ करण्याबाबत एअरजेट लूम ओनर्स असोसिएशन विचार करीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com