आयसीएस महाविद्यालयात प्रवेश प्रक्रीया सुरू

आयसीएस महाविद्यालयात प्रवेश प्रक्रीया सुरू

१४ (टूडे २ साठी)

‘आयसीएस’ची प्रवेश प्रक्रीया सुरू

खेड, ता. ३ : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान, आय. टी., बीएमएस, बीएस्सी कॉम्युटर सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या निर्देशांनुसार २५ मे पासून सर्व वर्गाचे प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना वितरीत करण्यास सुरवात करण्यात आले आहेत. १० जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या आत विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. पहिली गुणवत्ता यादी १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीर करण्यात येणार आहे. या गुणवत्ता यादीनुसार १४ ते २० जून या कालावधीत संबधित विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह प्रवेश निश्चित करावयाचे आहेत. दुसरी गुणवत्ता यादी २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीर होईल. त्यामधील विद्यार्थ्यांचे प्रवेश २२ ते २७ जून या कालावधीत निश्चित करण्यात येतील. तिसरी गुणवत्ता यादी २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीर होईल. त्यामधील विद्यार्थ्यांचे प्रवेश २९ जून ते ३ जुलै या कालावधीत निश्चित करण्यात येतील. इच्छूक विद्यार्थ्यांनी सविस्तर माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com