esakal | बांदा : बेकायदा गोवा बनावटीची दारू जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Wine Seized

बांदा : बेकायदा गोवा बनावटीची दारू जप्त

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा - गोव्यातून सिंधुदुर्गात होणार्‍या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने आज कारवाई केली आहे. यात ३५ दारुचे खपके व दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेली मोटार असा एकूण २ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी प्रथमेश प्रभाकर राऊळ (वय २६, रा. मोरेवडाचे टेंब, वाडोस, ता. कुडाळ) या युवकाला अटक करण्यात आली. दारु वाहतुकीसाठी वापरलेली अल्टो मोटार (एमएच ०२ बीडी ३५२३) ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई बांदा-पत्रादेवी मार्गावर करण्यात आली.

गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदा दारु वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती कोल्हापूर भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, उपनिरीक्षक आर. जी. येवलुजे, कुमार कोळी, जवान सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, कृष्णात पाटील व दीपक कापसे यांच्या पथकाने बांदा-पत्रादेवी रस्त्यावर सापळा रचला होता.

गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या अल्टो मोटारीला तपासणीसाठी थांबविण्यात आले. मोटारीच्या पाठीमागील डिकीत गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे ३५ दारूचे खोके बेकायदा आढळले. पथकाने दारूसह अल्टो मोटार जप्त करत चालकावर अटकेची कारवाई केली.

loading image
go to top