
Konkan Weather Update : मध्य महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवण्याची शक्यता असून पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, आज सायंकाळी उशिरा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या जोरदार सरी झाल्या.